पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फुटली ; नेमकं कारण काय?

पुणे :राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.मात्र आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालीना वेग आलेला असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची होऊ घातलेली युती देखील फुटल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी युती होण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली होती.या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल अशी चर्चा होती. पण आता पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली आहे.त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढण्याची शक्यता आहे.आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाची युती होण्याची शक्यता निर्माण झाली.

गेल्या दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढतील अशी घोषणा दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र या घोषणेला काही तास उलटून जाण्याच्या आधीच आता शिवसेना राष्ट्रवादीशी जुळून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे

.विशेष म्हणजे नव्या युतीच्या शक्यतेबाबत केवळ चर्चा नाही तर स्थानिक नेत्यांमध्ये बोलणी सुरू असून, सकारात्मक पद्धतीने जागा वाटपावर चर्चा झाली असून लवकरच घोषणा देखील केली जाईल अशी माहिती, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीची युती फुटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
