माणिकराव कोकाटेंनंतर आता भाजपचा नेता रम्मी खेळताना सापडला, पुण्यातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उडाली खळबळ…


पुणे : पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणानंतर आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे.

काल (सोमवारी) जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह २ ते ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी तळजाई भागात छापा टाकण्यात आला. यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे चिटणीस असलेले औदुंबर कांबळे आपल्या सहकाऱ्यांसोबत रमी खेळत असल्याचे आढळले. डाव रंगात आला असतानाच पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

औदुंबर कांबळे हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असून पर्वती विधानसभा मतदारसंघात तो चिटणीस पदावर कार्यरत आहे. त्याच्या अटकेनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. घटनेबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, हा प्रकार पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात औदुंबर कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!