लाडकी बहीणनंतर आता’ लाडकी विद्यार्थिनी योजना’ ; मुलींना दर महिन्याला 500 रुपये मिळणार

पुणे : महायुती सरकारकडून महाराष्ट्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सध्या महिलांसाठी मोठी आणि चर्चेत असणारी योजना आहे.त्यातच आता मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं आहे. उल्हासनगर महापालिकेकडून मुलींच्या शिक्षणासाठी ‘लाडकी विद्यार्थिनी योजना ‘सुरू करण्यात येणार आहे..

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने ‘लाडकी विद्यार्थिनी योजना’ अंतर्गत सातवी ते बारावीतील मुलींना दरमहा पाचशे रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्यार्थिनींना अशा प्रकारे नियमित आर्थिक मदत देणारी ही पहिलीच योजना असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणात सातत्य राहण्यास आणि शाळा सोडण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात महायुतीकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून दरमहा महिलांना पंधराशे रुपये दिले जातात. यातून महिलांना मोठं आर्थिक सहाय्य मिळत आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या योजनेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.