लाडकी बहीण योजनेनंतर राज्यात महिलांसाठी अजून एक मोठी योजना, राज्य सरकारची मोठी घोषणा…


मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्यातील महिलांसाठी आणखी एका नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आली आहे.

यामुळे महिलांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये पिठाच्या गिरणी साठी महिलांना अनुदान दिले जात आहे. गरजू महिलांसाठी सरकारकडून 90% अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही एक फायदेशीर योजना आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या अंतर्गत राज्यातील महिलांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता यावा. यातून महिला आपले घर संभाळू शकतात. या योजनेच्या माध्यमातून महिला 90 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी घेऊन स्वतःचा फ्लोर मिलचा व्यवसाय सुरू करू शकणार आहेत. या अंतर्गत महिलांना 90 टक्के अनुदानावर गिरणी मिळते.

यामुळे महिला आपल्या पायावर उभ्या राहतील. महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न राज्य सरकार करत आहे. योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील महिलांनाच मिळणार आहे.

यामध्ये इतर प्रवर्गातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. तसेच महिलांचे वय 18 ते 60 वर्षे यादरम्यान असावे. महिलांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावे. या योजनेचा अधिक लाभ ग्रामीण भागातील महिलांना दिला जाणार आहे. महिलेचे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक आणि गिरणी खरेदीचे कोटेशन आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!