मोठी बातमी! उद्योगपती अनिल अंबांनी यांच्यानंतर टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी…


मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण राजकीय घडामोडींनी तापलेलं असतानाच उद्योग जगतातून एक खळबळजनक बातमी आहे. प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांची चौकशी केल्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे.

मुंबईतीली ईडीच्या कार्यालयात टीना अंबानी यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे उद्योग जगतात एकच खळबळ उडाली आहे. अनिल अंबानी यांना अनेक कंपन्या विकाव्या लागल्या आहेत. अशातच आता ते ईडीच्या रडारवर आले आहेत.

विदेशी मुद्रेशी संबंधित कायद्याचं कथित उल्लंघन केल्या प्रकरणी अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाकडून ४२० कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानी कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला होता.

ईडीने सोमवारी अनिल अंबानी यांची ९ तास कसून चौकशी केली. त्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी या ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्या आहेत. टीना अंबानी या सकाळी १० वाजताच ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहे.

विदेशी मुद्रेशी संबंधित कायद्याचं कथित उल्लंघन केल्या प्रकरणी अनिल आणि टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. अनिल अंबानी यांच्याविरोधात फेमा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!