वडीलांनंतर काकांनी साथ दिली! रितेश देशमुख विलासरावांच्या पुतळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात झाले भावूक..!!


Ritesh Deshmukh : विलासराव आणि दिलीपरावांनी एकमेकांना जपलं. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, ही भावना एकमेकांनी कायम ठेवली. साहेबांना जाऊन जवळपास १२ वर्षे झाली, असे रितेश सांगत असतानाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

लातूरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. रितेश देशमुख म्हणाले, वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही.

पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आज आहे. मुलगा म्हणून साहेबांनी कधीच अडवले नाही. आम्हाला त्यांनी सुट दिली होती.

मुलांवर कधी कशाचा दबाव टाकू नये. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा घ्यावी. विलासराव माणूस म्हणून काय होते हे समजेल. राजकारणात टीका करा, पण व्यक्तिगत कोणावरही टीका करू नका हे विलासराव यांचे संस्कार आहे. असे रितेश देशमुख म्हणाले .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!