बिहार जिंकलं आता बंगाल की बारी!! मोठ्या यशानंतर आता भाजपच्या पुढच्या रणनीतीची घोषणा…


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या मतमोजणीला आज अधिकृतपणे सुरुवात झाली असून राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. २४३ जागांसाठीची मतमोजणी सुरु होताच पोस्टल मतांच्या पहिल्या कलांनी दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील संघर्ष चुरशीचा असेल, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

तसेच एनडीए आणि महागठबंधन हे दोन्ही पक्ष सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहेत, तर राजकीय विश्लेषकांच्या भाकितांमुळेही उत्सुकता आणखी वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीत ‘रालोआ’ने निर्णायक आघाडी घेतली आहे. २४३ जागांसाठीचे ट्रेंड जाहीर झाले आहेत, ज्यामध्ये एनडीए १६६ जागांवर तर महाआघाडी ७१ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

रालोआ स्‍पष्‍ट बहुमताकडे वाटचाल करत असल्‍याने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी भाजप बिहार जिंकण्याच्या तयारीत असल्याचा विश्‍वास व्‍यक्‍त करत आता आमचा पुढील विजय हा पश्‍चिम बंगालमध्‍ये होईल, असे भाकीत केले आहे.

बिहारमधील बेगुसरायचे खासदार असणारे गिरीराज सिंह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले की, बिहारमधील जनतेला जंगल राज नको आहे. राज्‍यातील जनतेने सातत्‍याने अराजकता आणि भ्रष्‍ट नेतृत्त्‍व नाकारले आहे. मी बिहारमधील भाजपचा कार्यकर्ता म्‍हणून स्‍पष्‍ट सांगतो की, बिहारमध्‍ये आमचा विजय होणार हे निश्‍चित आहे. आता पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आमचा पुढील विजय असेल.

बिहारमध्‍ये आमची वाटचाल विजयाकडे सुरु झाली आहे. आता आमचे पुढील लक्ष्‍य पश्‍चिम बंगाल आहे. सध्‍या या राज्‍यात अराजकता माजली आहे. संपूर्ण राज्‍य बाह्य हस्‍तक्षेप सुरु आहे. अखेर पश्‍चिम बंगालमधील जनताही हे सत्‍य ओळखेल.

बिहार निवडणुकीचे निकाल मतदारांनी अराजकतेला नाकारले अहो. एनडीएच्या विकास-केंद्रित अजेंडाला पाठिंबा दिला आहे. बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये उघडताना पाहतो. निकृष्ट दर्जाची ‘चरवाहा विद्यालये’ बदलली आहेत. ही प्रगती आहे,” असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!