११ वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ योगांचा संगम, ‘या’ चार राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार…


नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला केवळ धार्मिकच नव्हे, तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते. येत्या १४ जानेवारी २०२६ रोजी होणारे हे मार्गक्रमण देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकणारे ठरणार आहे.

१४ जानेवारी २०२६ रोजी होणारी मकर संक्रांत देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकणारी ठरणार असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. यंदा संक्रांतीचे वाहन, स्वरूप आणि ग्रहयोग पाहता ही संक्रांत अनेक अर्थांनी वेगळी आणि परिणामकारक मानली जात आहे. यंदाची मकर संक्रांती तब्बल ११ वर्षांनंतर येणाऱ्या दुर्मिळ दुहेरी योगामुळे अधिक महत्त्वाची ठरत आहे.

मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी हे दोन्ही योग एकाच दिवशी येत असल्याने या दिवसाला धार्मिकदृष्ट्या मोठे पुण्यदायी महत्त्व आहे. या योगामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिक, व्यापारी आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम दिसून येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पंचांगानुसार यंदाच्या मकर संक्रांतीचे नाव ‘नंदा’ असून तिचे स्वरूप वेगवान आणि प्रभावी आहे. यंदा संक्रांतीचे वाहन घोडा म्हणजेच अश्व आहे, तर उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेग, हालचाल आणि बदलांचे प्रतीक मानला जातो, तर सिंह पराक्रम, सत्ता आणि नेतृत्वाचे द्योतक आहे. त्यामुळे २०२६ मध्ये देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर वेगाने घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. राजकारण, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. गदा ही शिस्त, नियम आणि कडक निर्णयांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी, नियमांचे पालन आणि शिस्तीवर भर दिला जाईल, असे संकेत आहेत. संक्रांत बसलेल्या स्थितीत असल्याने सुरुवातीला व्यापारी क्षेत्रात काही प्रमाणात अस्थिरता जाणवेल, मात्र पुढील काळात स्थैर्य येण्याची शक्यता आहे.

यंदा ११ वर्षांनंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र येत असल्याने तिळाचे दान, हळद, अन्नधान्य आणि गरजूंना मदत करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेले दान दुप्पट पुण्य देणारे ठरते. त्यामुळे अनेक ठिकाणी दानधर्म, तिळगुळ वाटप आणि धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

पिवळे वस्त्र आणि कस्तुरी लेपनामुळे यंदा काही वस्तू महाग होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः सोने, हळद, कडधान्ये, पितळ आणि सुगंधी द्रव्यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संक्रांतीचा प्रवास दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे होत असल्याने उत्तर भारतातील राज्यांमध्ये विकासकामांना गती मिळू शकते आणि मोठ्या प्रकल्पांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राशीभविष्याच्या दृष्टीने मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ या राशींसाठी हा काळ प्रगतीकारक ठरणार आहे. आर्थिक लाभ, करिअरमध्ये संधी आणि नवीन उपक्रमांना यश मिळू शकते. वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींसाठी संमिश्र फळे दिसून येतील, मेहनतीनुसार यश मिळेल. तर कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो लांबचा प्रवास टाळावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!