येरवडा जेलमधील कैद्यांसाठी आनंदाची बातमी! फोन बाबत प्रशासनाने घेतला मोठा निर्णय..
पुणे : पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता येरवडा कारागृहात राहणाऱ्या या ठिकाणी असलेल्या कैद्यांना आता घरच्यांसोबत महिन्यातून ३ वेळा घरच्यांशी फोनवर बोलता येणार आहे. प्रशासनाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेच उद्घाटन करण्यात आले. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिन्यातील ३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. हा प्रायोगिक प्रकल्प जर यशस्वी झाला तर राज्यातील इतर कारागृहात हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, याआधी पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलता येणार असल्याचे जाहीर केले होते.
कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही अडचण आली तर निर्णयात बदल देखील केला जाऊ शकतो.