आता जिल्हाधिकारी कार्यालयांचा कारभार पूर्णपणे ऑनलाइन, फाईल गहाळ होण्याची कटकट मिटणार…


पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ई-ऑफिसनुसार सर्व विभागात अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्व विभागात ई-फाइल्सच्या माध्यमातून 100 टक्के ऑनलाइन काम सुरू झाले आहे. तसेच प्रांत, तहसील आणि मंडल कार्यालयात ई-ऑफिसचे काम प्रलंबित आहे.

या कार्यालयातील ई-ऑफिसचे कामकाज लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये अजून बदल दिसून येतील. सध्या सर्व विभागांमध्ये ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून ई फाइल्सनुसार काम सुरू झाले आहे.

ई-ऑफिसमध्ये कोणतीही फाइल काही मिनिटांत शोधणे शक्य होणार आहे. असे असले तरी तहसीलदार, प्रांत कार्यालयांमध्ये ई-ऑफिसचे काम रखडले आहे. यासाठी अजून काम करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोणत्याही फाइल्सचा प्रवास एका विभागातून दुसर्‍या विभागाद्वारे जिल्हाधिकार्‍यांपर्यंत होतो. त्या फाइल्सला पूर्वी ट्रॅक ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे एखाद्या प्रकरणाची फाइल कोणाकडे, कोणत्या विभागाकडे प्रलंबित आहे हे कळत नव्हते. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या.

ई ऑफिसमुळे कोणत्या विभागाकडून कोणता प्रस्ताव आला आहे, हे समजेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती आवक-जावकसह सर्व विभागांमध्ये ‘ई- ऑफिस’ प्रणाली राबविली जात आहे. यामध्ये अनेक बदल केले गेले आहेत. याबाबत अजून काम करण्यासाठी बदल सुरू आहेत.

त्यासाठी संगणक, उच्च क्षमतेचे (हायस्पीड) स्कॅनरच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ई-ऑफिसचे राष्ट्रीय सूचना केंद्राकडून चांगली संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक ठिकाणी बदल बघायला मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!