अदित्य ठाकरे यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल ! ठाकरे , शिंदे गटात वाद वाढण्याची शक्यता ..!!
मुंबई : बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमधील एन एम जोशी पोलीस स्थानकात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे व शिंदे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील लोअर परेल उड्डाण पुलाची एक मार्गीका सुरू करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या मार्गीकेचे काम देखील सुरू होते. हा पुल सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी देखील अनेक वेळा डेडलाईन दिल्या होत्या. मात्र या पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळेच गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्याकडून याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे परेल पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.