आदित्य ठाकरे यांचे नाव ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या युवा नेत्यांच्या यादीत ; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव…!


मुंबई : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या प्रसिद्ध झालेल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. यात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह देशभरातील सहा तरुण नेत्यांचा नावाचा समावेश आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आदित्या ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली नेते होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश वर्ड इकॉनॉमिक फोरममध्ये समावेश होणं हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने गौरव आहे. आदित्य एक मंत्री, नेता म्हणून जागतिक ठसा उमटवत आहेत, आदित्य हे उज्ज्वल राजकीय भविष्य आहे”, असं राऊत म्हणालेत. ठाकरे परिवार, सहकारी यांचे बाबतीत खोटे गुन्हे दाखल करणे ,संपत्तीचा विषय व्हिडिओ मॉंर्फिंगचा विषय, फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरू आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

याचदरम्यान ,शीतल म्हात्रे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पण मला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आमच्या घरात पोलीस येत आहेत. हा काय प्रकार सुरूय. मुळात हा व्हिडिओ त्या आमदाराच्या मुलानं शेअर केलाय. त्याला अटक केली का? मग कोणाची बदनामी करताय असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला प्रश्न केलाय. ज्या काही समजतयं, त्याअर्थी पहिले गुन्हेगार ते आहेत मुके घेणारे, दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. दादांचा एक सिनेमा होताच, मुका घ्या मुका… आता नव्याने शिंदे गट हा सिनेमा करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत राऊत यांनी व्हिडिओप्रकरणी भाष्य केलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अश्लील वर्तन करत असाल, तर अश्लील वर्तन करणाऱ्यांवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तारा, आमच्याकडे बोटे दाखवू नका, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, असे म्हणत खासदार राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. तर कारवाई झालेल्या कार्यकर्त्याच्या घरी कालसुषमा अंधारे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या घरच्यांना धीर दिला. आता राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!