‘महसुल’चा काळा कारभार उजेडात! पुणे विभागाचे अतिरिक्त महसुल आयुक्त अनिल रामोड लाच घेताना थेट सीबीआय कडून रंगेहाथ अटक …!!


पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त आहेत. आज विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले. तसेच त्यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने धाड टाकली आहे.

ही लाच हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होती. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. यामुळे आता चौकशी सुरू आहे. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. त्यांना वेळ हवी होती.

रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे. आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाच घेऊन कामे केली जातात. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!