मोबाईलचे व्यसन, वडिलांनी खडसावले अन् बारावीतील मुलीने आयुष्यच संपवल, पुण्यातील घोडेगाव परिसरातील घटना..!


पुणे : मोबाइल पाहण्यावरून वडिलांनी रागवल्याने बारावीतील युवतीने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात घडली.

भूमी सोनवणे (वय १९, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, भूमी बारावीत शिकत होती. तिचे वडील व्यावसायिक आहेत. बारावीचे वर्ष असल्याने सारखा मोबाइल पाहू नको, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, असे तिला वडिलांनी सांगितले होते.

त्यानंतर वडील ओरडल्याने भूमी रात्री इमारतीच्या छतावर गेली. तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी भूमी इमारतीच्या आवारात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे सोनवणे कुटुंबीयांनी पाहिले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!