अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण; सेन्सेक्स, निफ्टीत विक्रीचा जोर…!

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला. सोमवारी सेन्सेक्स 230 अंकांनी घसरून 59101 वर, निफ्टी 62 अंकांच्या कमजोरीसह 17542 वर तर बँक निफ्टी 489 अंकांच्या घसरणीसह 39856 वर उघडला.अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.

यादरम्यान अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार रिकव्हरी दाखवत असला तरी. सध्या सेन्सेक्स 291.11 अंकांच्या वाढीसह 59,630.61 अंकांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 103 अंकांच्या वाढीसह 17708 अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. बजाज ट्विन्सच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
Views:
[jp_post_view]