Adani Group Business : अदानी यांचा धमाका सुरू! केवळ दोन दिवसात केली २१, ५४५ कोटींची कमाई..

Adani Group Business : सध्या उद्योगपती गौतम अदानी यांचा धमाका सुरू आहे . विशेष बाब म्हणजे दोन दिवसांत कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये २१,५०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ८०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
गौतम अदानी यांच्या अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये गेल्या दोन व्यवहार दिवसांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये ३६.४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. Adani Group Business
मंगळवारच्या विपरीत, बुधवारी केवळ अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली. ही घसरण फारशी नव्हती. पण एक कंपनी अशी देखील होती ज्याने मंगळवार प्रमाणे वाढ दर्शविली आणि बाजार बंद होईपर्यंत १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याचा अर्थ या कंपनीने दोन दिवसांत ३६ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. ही कंपनी दुसरी कोणी नसून अदानी टोटल गॅस आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, कंपनीचा शेअर सोमवारी ५३६.८० रुपयांवर होता, तो वाढून ७३२.७० रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची वाढ दिसून आली. तर आज कंपनीचे समभाग १३.७५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कंपनीचा स्टॉक हिंडेनबर्ग अहवालापूर्वीच्या पातळीपेक्षा ८१ टक्के कमी आहे. २४ जानेवारी रोजी कंपनीचा शेअर ३,८८५.४५ रुपयांवर होता. जे अद्याप ८०० रुपयांपर्यंत पोहोचलेले नाही.
हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर, अदानी समूहाची ही कंपनी आहे जिला सर्वाधिक फटका बसला आहे. इतर कंपन्यांमध्ये लक्षणीय वसुली दिसून आली आहे.