अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट, म्हणाली त्याने स्वतःच्या सोईनुसार वापरलं…


मुंबई : अभिनेत्री मानसी नाईक ही चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होती. त्यानंतर अनेकवेळा मानसीच्या घटस्फोटाविषयी चर्चा सुरु होत्या. आता तिने सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत तिच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.

यामध्ये मानसीने म्हटले आहे की, ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात.

त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही.

मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा पण तरीही फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं.

आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा लक्षात येतं तो क्षण फार फार दुखरा असतो. जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला नाही असं नाही, पण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!