शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशलची मोठी घोषणा!! म्हणाला, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन…


रायगड : नुकत्याच आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत असणाऱ्या विकी कौशलचे अवघ्या देशभरात कौतुक होते आहे. त्याने या चित्रपटात केलेली भूमिका अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाठीवर प्रेक्षक कौतुकाची थाप देत आहेत.

अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम साकारल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटली आहे. स्वराज्याच्या धाकल्या धन्यांचे आयुष्य या सिनेमात अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने मांडण्यात आले. अनेकांचे डोळे हा चित्रपट बघून पाणावले आहेत.

त्यामुळे विकी आणि सिनेमातील इतर कलाकारांचे कौतुक होत असताना अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणाला, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने तो किल्ले रायगडावर पोहोचणार आहे. याठिकाणी तो शिवरायांना नतमस्तक होणार आहे.

‘छावा’ रीलिज होण्याच्या आधीपासूनच विकी प्रमोशन, मुलाखातींमध्ये व्यस्त आहे. त्याने सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रायगडावर जाण्याची इच्छाही व्यक्त केलेली, अखेर शिवजयंतीच्या निमित्ताने तो रायगडावर जाणार आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मी विकी कौशल स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगडावर जात आहे. ‘आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषाने साजरी करूयात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, असं त्याने व्हिडिओत म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!