अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक; वडिलांनंतर 3 वर्षानी आईचंही निधन…


मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे निधन झाले आहे. सांतिरानी असे त्यांच्या आईचे नाव होते. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्याने मिथुन चक्रवर्ती मातृशोकात आहेत.

मिथून यांचा सर्वात छोटा मुलगा नमाशी याने आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनेत्याची भेट घेऊन त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांच्या वडिलांचं म्हणजेच बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांआधीच निधन झाले होते. वडिलांनंतर आता मिथुन चक्रवर्तींच्या डोक्यावरून आईच्या मायेचं छत्र देखील उडाले आहे.

मिथुन चक्रवर्तीच्या आईच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलिवूड कलाकारांबरोबरच अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांची भेट घेत आईला श्रद्धांजली वाहली आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्विट करत सांतिरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!