अभिनेता आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास

मुंबई : बॉलीवूड मधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती खुरानाच्या वडिलांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१९ मे) चंदीगढ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज (१९ मे) सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या अभिनेत्याचे वडील पंडित पी खुराना हे ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली होती. त्यांनी या क्षेत्रात प्रचंड आदर आणि सन्मान मिळवला होता.
Views:
[jp_post_view]