अभिनेते, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रशियन पत्नीने तिरूमला येथे केले मुंडण, मुलाचा नवस केला पूर्ण..

मुंबई : अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण त्यांची पत्नी अन्ना लेझनेवा तिरुमाला येथे व्यंकटेश्वराच्या दर्शनालाही गेली. याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. तिरुमला येथे अन्ना लेझनेवाचे मुंडण करतानाचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पवन कल्याणच्या जनसेना पक्षाच्या ट्विटर वरून फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये अन्नाने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपले केस दान केल्याचे म्हटले आहे. याबाबत माहिती अशी की, अलीकडेच सिंगापूरमधील शाळेत लागलेल्या आगीत त्यांचा धाकटा मुलगा मार्क जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पवन कल्याण सिंगापूरहून हैदराबादला परतताना आपल्या मुलाला उराशी धरुन घेऊन जाताना दिसला.
त्यानंतर अभिनेत्याची रशियन पत्नी अन्नाने आपल्या मुलाला संकटातू वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. त्यासाठी ती देवाला आली असल्याचे सांगितले जात आहे. अन्ना लेझनेवा हिने तिरुमला मंदिराच्या भेटीदरम्यान एका धार्मिक घोषणापत्रावर स्वाक्षरी केली – ही हिंदू नसलेल्या भाविकांसाठी एक परंपरा आहे. या जाहीरनाम्यात भगवान वेंकटेश्वरावरील भक्तांच्या श्रद्धेला आणि पवित्र हिंदू मंदिरात आशीर्वाद घेण्याच्या त्यांच्या हेतूला स्पष्ट केले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिंगापूरच्या रिव्हर व्हॅली परिसरातील एका शाळेत आग लागली. शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धुराने भरलेल्या वर्गाच्या खिडक्या फोडून घाबरलेल्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाचवताना दाखवले आहे.
वरच्या मजल्यांमधून काळ्या धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते. यामध्ये पवन कल्याण यांचा मुलगा जखमी झाला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती. तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भक्तांना मिळालेल्या आशीर्वादांबद्दल आभार मानण्याची ही त्यांची पद्धत आहे. काही लोक प्रार्थना करण्यापूर्वी देखील ते करतात, जेणेकरून त्यांना आतून आणि बाहेरून स्वच्छ वाटेल आणि देवाला पाहण्यापूर्वी त्यांना नवीन सुरुवात करता येईल.