कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी आले आणि राज ठाकरे म्हणाले, ‘आरडाओरडा करू नका, माझा नातू…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस येत आहे. वाढदिवसानिमित्ताने पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोष करणे अशा प्रकारे साजरा केला जातो.
अनेक कार्यकर्ते दरवर्षी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन रात्री १२ वाजता केक कापतात. राज ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी करत जल्लोष करतात. आता देखील असेच काहीसे झाले आहे.
या अतिउत्साही कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी ‘माझा नातू आजारी आहे, आरडाओरडा करू नका’ असे प्रेमाने फटकारले. यानंतर राज ठाकरे यांनी केक कापला आणि निघून गेले.
राज ठाकरे यांनी काल रात्री उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल असंख्य मनसैनिक शिवतीर्थावर आले होते.
रात्री १२ वाजता राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.