माध्यमांसमोर काँग्रेसचे धिंडवडे काढणाऱ्यांवर कारवाई करावी….!
राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारींची मागणी

पुणे : भारत जोडोमुळे राज्यात काँग्रेस पक्षास पोषक झालेले वातावरण काही नेते स्वअस्तित्वासाठी, अहंभाव व संकुचित हेतूने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते राज्यातील काँग्रेसजन खपवून घेणार नाहीत असा संतप्त इशारा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.
राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय अस्तित्वासाठी सत्यजित तांबे व चंद्रकांत हंडोरे प्रकरणाच्या निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे काढण्यासाठी पुढे सरसावली असून, माध्यमांसमोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढून, पक्षाचीच बदनामी करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर प्रथम पक्षश्रेष्ठींनी त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.
तिवारी यांनी सांगितले की माध्यमांसमोर न जाता ही त्यांना आपली बाजू पक्षाध्यक्षांसमोर मांडता आली असती, मात्र एकीकडे सर्व विचारांती पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्यजित तांबे प्रकरणी शिस्तभंग समितीचा निर्णय जाहीर केला असता पुन्हा पक्षाध्यक्षांच्या निर्णयावरच् एक प्रकारे आक्षेप घेणे हा कोणता प्रकार आहे ?
ते म्हणाले, ”पक्ष-विरोधी भुमिकेतून, पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणे हेच पक्ष विरोधी कृत्य असून याची गंभीर दखल घेऊन माध्यमांसमोर आरोप करणाऱ्यांवरच (माजी आमदार आशिष देशमुख) पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करणेच गरजेचे आहे.”
आरोप करणारे नेते, राज्यात तब्बल 16 दिवस राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चाललेली असताना फारसे कुठेच दिसले नाहीत. हंडोरे पराभव प्रकरणी त्याचवेळी केंद्रीय निरीक्षक येऊन चौकशी करून तत्काल सोनिया गांधींकडे अहवाल सोपवला आहे. या प्रकरणी माजी आमदार देशमुख वेगळे काय सांगत आहेत. महाराष्ट्रासह इतरही प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांची (प्रोसीजर) प्रक्रिया चालू आहे. असे असताना माध्यमांसमोर पक्ष 5 व्या क्रमांकावर जाईल अशी पक्षास खच्ची करणारी निंदनीय वक्तव्ये करण्यात कोणती धन्यता मानीत आहेत, असा सवालही काँग्रेस प्रवक्ते तिवारी यांनी केला आहे.
राज्यात प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्र्या सह, सर्व नेते राहुल गांधींच्या पदयात्रेसाठी व जाहीर सभांसाठी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये जाऊन झटत होते. पक्षाध्यक्ष व इतरही नेते सतत गांधींसोबत चालत होते, पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घालत होते. व त्यामुळे तिवारी यांनी दिला. पक्षश्रेष्ठींनी पक्षाची लक्तरे माध्यमांसमोर टांगणाऱ्यांवर त्वरीत शिस्त भंगाची कडक कारवाई करावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.