पुण्यात महामार्गांवर अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू! हडपसर ते यवत कारवाईला सुरुवात…

उरुळीकांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत , चांदणी चौक ते पौड तर नाशिकरोड वरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. पीएमआरडीए , एनएचआय, सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे आजपासून कारवाई सुरू केली आहे. महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पुणे शहराभोवती होत असलेल्या वाहतुक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ही संयुक्तिक कारवाई ३ ते १० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. हडपसर ते यवत पर्यंत होणाऱ्या या कारवाई महामार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या रस्त्याच्या हद्दीप्रमाणे ६० मीटर अंतर्भागातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे. तसेच या कारवाई बरोबर प्रशासन वर्षात दोन वेळा अतिक्रमणांवर कारवाई सुरू ठेवणार आहे.
आज हडपसर भागातील अतिक्रमणावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे.
हडपसर भागातील अतिक्रमणावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे.
या महामार्गाच्या हद्दीमध्ये ८ किमी ते २५२.३५० किमी म्हणजे हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यापुढील काळात वर्षातून दोन वेळा अशा प्रकाराच्या कारवाईचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत, असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
जाणून घ्या कशी होणार कारवाई..
३ ते १० मार्च – पुणे-सोलापूर महामार्ग (हडपसर ते यवत व उरुळी कांचन ते शिंदवणे), पुणे-नाशिक महामार्ग (राजगुरुनगर), चांदणी चौक ते पौड.
१० ते २० मार्च – पुणे-सातारा महामार्ग (नवले पूल ते सारोळे) सूस मार्ग हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट नवलाख उंब्रे ते चाकण हिंजवडी परिसर-माण.
हडपसर ते यवत, चांदणीचौक ते पौड तसेच नाशिक रोडवरील पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकामे पाडण्यास आज सकाळपासून सुरुवात केली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ही कारवाई पूर्ण करण्यात येऊन वर्षात पीएमआरडीए अशा बांधकामांवर लक्ष ठेऊन नियंत्रण ठेवणार आहे.
डॉ. दिप्ती सुर्यवंशी. सहाय्यक आयुक्त पीएमआरडीए.