उरुळी कांचन जवळील वळती येथे बैलपोळ्याच्या मिरवणूकीत १२ वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीत कुख्यात गुंड गोरख कानकाटे यांच्यासह २४ आरोपींची निर्दोष मुक्तता

उरुळी कांचन : बैलपोळ्याच्या सणानिमित्त मिरवणूक चालू असताना बैल बुजवण्यावरून २७ सप्टेंबर २०११ रोजी वळती (ता. हवेली) येथील गावात किरकोळ वाद झाला होता. या वादातील २४ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एस जी. बर्डे यांच्या कोर्टाने दिले आहे. अशी माहिती आरोपींचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.
गोरख कानकाटे, अनिल कुंजीर, सुनील कुंजीर, देवराम कुंजीर, मारुती कुंजीर, भगवान कुंजीर, सोन्या उर्फ विशाल कुंजीर, आण्णा गवारे, सोमनाथ कांचन, प्रमोद काळूराम कांचन, राजेंद्र गोते, अनिल मोहिते, प्रवीण उर्फ आप्पा कुंजीर, गणेश शामराव कुंजीर, राहुल कुंजीर, सचिन कुंजीर, दीपक कुंजीर, जीवन कुंजीर, प्रदीप कुंजीर, विशाल लोणारी, संतोष कायगुडे, नवनाथ कुंजीर, गणेश कुंजीर, जालिंदर कुंजीर, प्रमोद उर्फ पिंटू सुरेश कुंजीर, अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल; जाणून घ्या..
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण उर्फ अप्पा कुंजीर, गोरख कानकाटे, अण्णा गवारी, सोमनाथ कांचन, प्रमोद कांचन, विशाल लोणारी, व इतर २३ ते ३० लोकांनी मिळून हातात कोयता, काठ्या, दगड घेऊन वळती गावातील १० ते १५ लोकांच्या घरावर दगडफेक करून गावातील वाहने तसेच दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर एकूण २५ आरोपींच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वकिलाचा पेहराव करून भर कोर्टात कुख्यात गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळ्यांची बरसात
दरम्यान, सरकार पक्षातर्फे केस मधील महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्या नंतर दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला होता. आरोपींनी कुठलाही गुन्हा केला नसून केवळ राजकीय द्वेषापोटी आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा युक्तिवाद आरोपींतर्फे ॲड. नितीन भालेराव यांनी न्यायालयात केला होता.
लोकं मारतील म्हणून आरामबसच्या वाहन चालकाचा पळून जाताना वाहनाने चिरडले; उरुळी कांचन येथील घटना
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सर्व आरोपींच्या विरुद्ध पुरावे नसल्याने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी एस जी. बर्डे यांच्या कोर्टाने दिले आहेत. हा गुन्हा कोणत्याही निकषावर न टिकल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.