संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात काय घडलं?

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. पण दुसरीकडे न्यायालयातून मोठी बातमी समोर आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना १४ दिवसाचे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, या आरोपींचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आरोपींना पुन्हा तपासासाठी पीसीआर देण्याच्या अटीवर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. कुठलाही तपासाचा नवीन मुद्दा उपस्थित झाला नाही.
सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने १४ दिवस लगेच मान्य केलं, अशी माहिती सरकारी तर, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावर २० जानेवारी रोजी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.
आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने वाढीव तारीख दिली . खंडणी प्रकरणात कराड व चाटे या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. कराडच्या वकिलांनी तारीख वाढवून घेतली.पक्षाचे वकिल बाळासाहेब कोल्हे यांनी दिली आहे.