घरफोड्यांतील 12 गुन्ह्यांत 2 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

लोणी काळभोर : दौंड तालुक्यात घरफोड्यांकरून २ वर्षापासून १२ गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी कोहिनूर विशाल पवार (वय २१, रा. रा.म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांचे पथक उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत फरारी आरोपी कोहिनूर पवार हा उरूळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत कुंजीरवाडी फाटा परिसरात असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारणा केली असता त्याने आपण दौड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
अधिक चौकशीत तो गेले २ वर्षापासून १२ गुन्ह्यात फरार असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

त्याचेवर योग्य ती खात्री करून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करीता यवत पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस उपविभाग दौंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजय घुले, चमन शेख, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, निलेश शिंदे, धीरज जाधव
यांनी केली आहे.