Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू..
पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमाटणे फाटा येथे आज (ता.१३) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला आहे.
भालचंद्र अहिरकर (वय ३५), अर्जुन शेळके (वय ४०) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पिंपरी- चिंचवडमधील यमुना नगर येथील रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथून आहिरकर आणि शेळके दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.