काळाचा घाला ! पुणे -नगर महामार्गावर अपघातात दोन वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी अंत झाला..!

पुणे : शिरूरनजिक रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे नगर महामार्गावर फलकेमळा येथे एक वाजता ही घटना घडली. कार पुण्याच्या दिशेने निघाली होती. तर कंटेनरदेखील नगर बाजूकडून पुण्याकडे निघाला होता. याचदरम्यान कार व कंटेनरच्या धडकेत दोन वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
दरम्यान या अपघातातील कंटेनर ( MH ४२BG २७७६) हा मालवाहू कंटेनर असून तो नगरकडून पुण्याकडे निघाला होता. तर पुण्याकडेच निघालेली कार (MH१२EM २९७८) त्या कंटेनरला पाठीमागून धडकली. यावेळी कारमध्ये चौघे होते. त्यामध्ये दोन वर्षाच्या एका मुलीचा समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात चारजण मृत्यूमुखी पडले, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र त्यामध्ये दोन वर्षाची चिमुकली असल्याने परिसरात नागरिकही हळहळले. या घटनेचा तपास सुरू आहे.
Views:
[jp_post_view]