शिंदे गटाच्या ‘या’ दोन आमदारांचा अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर


पुणे : शिंदे गटाच्या चोपडा तालुक्याच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा काल (ता.२७) रात्री अपघात झाला आहे. जळगावच्या करंज गावाजवळ हा अपघात झाला. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत आमदारांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.

उरुळी कांचन, लोणी काळभोर व सहजपुर येथील गावठी हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्काचा छापा; पावणे ४ लाखाचा मुद्देमाल केला जप्त, ७ जणांवर गुन्हा दाखल

या अपघातामध्ये सुदैवाने आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांना फक्त मुकामार लागला असून किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती आहे.

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मिळालेल्या माहिती नुसार, काल (ता. २७) दोन्ही आमदार काही कार्यक्रमांसाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

मगर बघताना अचानक तिच्यासमोर पडला अन् मगरींनी केले तुकडे- तुकडे, घटनेने उडाली खळबळ

हा भूमिपूजन कार्यक्रम आटोपून संध्याकाळी त्यांच्या खाजगी वाहनाने चोपडा येथून खेडीभोकरी भोकर मार्गे जळगाव येथे निघाले होते. यावेळी गौण खनिज वाहणाऱ्या डंपरने आमदारांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही आमदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!