Accident News : पुणे ठरतंय अपघातांचे शहर! आता नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेनंतर ट्रकने पेट घेतला, चार जणांचा होरपळून मृत्यू…
Accident News पुणे : पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र सुरूच असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर इतर जखमी झाले आहेत. Accident News
मक्याचा भुसा घेऊन साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. Accident News
यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेले चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.
अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांचा आकडा चार इतका आहे. तर दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे.
परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.