Accident News : मोठी बातमी! नगर हायवेवर तिहेरी अपघात, एक कुटूंब जागेवर संपलं, घटनेत १० जणांचा मृत्यू…


(Accident News) पुणे : नगर-कल्याण महामार्गावर मोठा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भीषण अपघात तब्बल १० जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. ट्रक पिकअप आणि रिक्षा यांच्या धडकेत हा विचित्र अपघात झाला आहे.

गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अपघातात पिकअप मधील एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.

तसेच रिक्षामधील चार प्रवाशांचा ही जागीच मृत्यू झाला आहे रिक्षा चालक नरेश दिवटेची ओळख पटली असून रिक्षातील इतर तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम ओतूर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा जवळ प्रवासी रिक्षा, पिकअप आणि ट्रक असा तिहेरी अपघात झाला. यात एकूण १० जणांचा मृत्यू झाला. Accident News

पोलिसांकडूनस्थानिकांसह मदत कार्य चालू असल्याचे पुढे आले आहे. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत असून अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओतूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!