Accident News : बेधुंद जेसीबी चालकाचा थरार, १० ते १२ जणांना उडवले, एकाचा जागीच मृत्यू…

Accident News : लातूर शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील १० ते १२ जणांना उडवलं. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
जालिंदर मुळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लातूर शहरातील कन्हरी चौकात एका जेसीबी चालकाने मद्य प्राशन करून, बेधुंद अवस्थेत दहा ते बारा जणांना उडवलं. यामध्ये जालंदन मुळे नावाच्या युवकाचा मृत्यू झाला. जालंदर मुळे हा युवक भाजीपाला आणण्यासाठी गेला असता जेसीबी चालकाने त्याला उडवलं.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी रात्री या जेसीबी चालकाचे त्याच्या मित्रासोबत भांडण झाल्याची माहिती आहे. भांडण झाल्यानतंर त्या चालकाने दारू प्यायली आणि जेसीबी भरधाव वेगाने चालवत कन्हेरी चौकात गेला. हा जेसीबी अतिशय वेगाने जात होता. Accident News
त्यामुळे रस्त्यावरील १० ते १२ जण जखमी झाले. यापैकी जालंदर मुळे नावाचा युवक भाजीपाला आणण्यासाठी गेला होता. त्याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.