Accident News : ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, कारचा अक्षरशः झाला भुगा…
Accident News : अपघातांच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. . जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगममध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या वाहनाला गुरुवारी अपघात झाला. या घटनेतून मुफ्ती थोडक्यात बचावल्या आहेत. मेहबुबा मुफ्ती यांना दुखापत झालेली नाही.
पीडीडी मीडिया सेलने दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री मेहबुबा आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी कोणतीही गंभीर दुखापत न होता सुखरूप बचावले. मात्र, कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. Accident News
तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संगम येथे माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची कारला धडक बसली. ही दुर्घटना घडली तेव्हा मुफ्ती या आगीत पीडितांना भेटण्यासाठी खानबल येथे जात होत्या.
मात्र, त्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला या घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे. यानंतर पीडीपी अध्यक्ष आपल्या नियोजित दौऱ्यावर निघाल्या. या घटनेने मात्र एकच गोंधळ उडाला आहे.