Accident News : ब्रेकिंग! माळशेज घाटात भीषण अपघात, ट्रक आणि बसची धडक, २० प्रवासी गंभीर जखमी…


Accident News पुणे : नगर – कल्याण महामार्गावर असणाऱ्या माळशेज घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

कल्याण या ठिकाणाहून शिरोळीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. Accident News

यानंतर जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमी रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहिती नुसार, अपघातग्रस्त बस ही कल्याण या ठिकाणाहून शिरोळीच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये जवळपास २५ प्रवासी प्रवास करत होते.

मात्र अचानक समोररून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या घटनेनं प्रवासी नागरिक भीतीच्या छत्र छायेखाली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!