Accident News : १० वर्षांनंतर आयुष्यात आलेल्या बाळाच बारस केलं अन् पुण्याला परतत असताना आक्रीत घडलं, अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू…
Accident News : राज्यात अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लिंबेजळगाव परिसरात, दहा वर्षांनंतर बाळाचं बारसं आटोपून पुण्याला परतताना एक भीषण अपघात घडला आहे.
स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेत सहा महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये बाळ अमोघ देसरकर, त्याची आई मृणाली देसरकर, आजी आशालता हरिहर पोपळघट आणि दुर्गा सागर गिते यांचा समावेश आहे.
सविस्तर माहिती अशी की, अमरावतीतील अभियंता अजय देसरकर आपल्या कुटुंबियांसह पुण्याला जात होते. दहा वर्षांनी घरात बाळ जन्माला आल्याने ते बाळाचं बारसं करण्यासाठी एका खास आनंददायी क्षणाची तयारी करत होते.
बारसं आटोपून परतताना, लिंबेजळगाव परिसरात त्यांच्या कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले आणि एका कुटुंबाचे तीन सदस्य जागीच मृत्यूमुखी पडले. Accident News
या अपघातामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, स्कॉर्पिओ चालक विशाल ज्ञानेश्वर चव्हाण मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. त्याच्या सहकारी कृष्णा कारभारी केरेच्या नावावर असलेल्या वाहनामुळे अपघात घडला. अपघातानंतर स्कॉर्पिओतील चालक आणि एक अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून स्कॉर्पिओ चालक विशाल आणि त्याचा सहकारी कृष्णा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.