Accident News : बेवड्या कारचालकाचा वाहनावरचा ताबा सुटून कार वीस फूट नर्सरीत घुसली! कोरेगावमूळ येथील कष्टकरी नर्सरी व्यावसायिक महिलेचा चिरुडून अंत..!!
Accident News उरुळीकांचन: पुण्याहून मद्यधुंद अवस्थेत सोलापूर दिशेने बेधुंदपणे कार चालविणाऱ्या कारचालकाचा वाहनावरुन तोल सुटून कारने एका दुचाकी वाहनाला जोरदार धडक देऊन ही कार पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वीस फूट आत असलेल्या नर्सरीत शिरुन नर्सरीत ट्रक मध्ये झाड भरणाऱ्या वृद्धेला ही कार जोरदार पणे धडडून कार व ट्रकमध्ये चिरडून नर्सरी व्यावसायिक महिला दुर्दैवी मृत्यूमुखी पडल्याची घटना कोरेगावमूळ (ता.हवेली ) येथील इनामदारवस्ती येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मध्यधुंद वाहनचालकाविरुध्य गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालक राजेंद्र गोपीनाथ मदने (रा. खैरेवाडी ,पुणे ) असे वाहनचालकाचे नाव आहे. तर स्मिता ज्ञानेश्वर शिंदे (वय.६१, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर दुचाकीचालक विजू राजू थोरात (वय.४०) व नाना लबडे (वय. ४५, रा. दोघेही हिंगणगाव, ता. हवेली) हे वाहनाच्या धडकेत जखमी झालेले नाव आहे. Accident News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुण्याहून सोलापूर दिशेने मारुती कंपनीची बलेनो ( MH 12 PC 3691) ही कार चालक राजेंद्र मदने हा मद्यधुंद अवस्थेत चालला होता. भरधाव वेगात असणारऱ्या या कारने कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्तीवर दुचाकीचे पट्रोल संपल्याने पायी वाहन घेऊन जाणाऱ्या विजू थोरात व नाना लबडे यांना दुचाकीने जोरदार धडक दिली.
त्यानंतर ती कार वीस फूट आत आकाश नर्सरीत शिरली.नर्सरीत गाडी भरत असलेल्या ट्रक दिशेने कार आदळून गाडी भरणाऱ्या स्मिता शिंदे या ट्रक व कारमध्ये सापडून जबर मार लागला त्यानंतर त्यांना जवळीक हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्या उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडल्या होत्या. दरम्यान एका कष्टकरी नर्सरी चालकाचा अशा पध्दतीने दुर्दैवी अंत झाल्याने घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ करण्यात आली.