Accident News : वाघोलीत भयंकर घटना! भरधाव डंपरने एकाला उडवले, दूध विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू…

Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच घटना पुण्यातील वाघोली परिसरात घटना घडली आहे. भरधाव डंपरने सायकल हातात घेवून जाणाऱ्या पादचारी व्यक्तीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.

या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील चोखीधानी रोडवर उबाळे नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Accident News
याप्रकणी समाधान इंद्रजित सरडे (वय. २०, रा वाघोली) यांनी फिर्याद दिली. इंद्रजीत निवृत्ती सरडे (वय. ५८ वर्षे, पोतदार स्कुलशेजारी, वाघोली) असं मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालक राजु पांडु चव्हाण (वय २४ वर्षे, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, इंद्रजीत हे दूध वितरित करून हातात सायकल घेवून घराकडे निघाले होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली.
दरम्यान, या धडकेत ते गंभीर जखमी होवून मृत्यूमुखी पडले. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.