Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ३८ प्रवाशांच्या बसची ट्रकला धडक, चालकाचा बसवरील ताबा सुटला अन्..


Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. खासगी बसने उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या धडकेत २६ प्रवासी जखमी झाले असून यातील ८ जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

हा भीषण अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे-मुंबई लेनवरील खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नवीन बोगद्यामध्ये झाला आहे. ट्रकमधील हवा कमी झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला तिसऱ्या लेनवर उभा करण्यात आला होता.

त्यावेळी पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस क्र.एमएच 03 डीव्ही 2412 या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला आहे. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करत होते. Accident News

दरम्यान, त्यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर काही काळ एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. पण अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. बाळूमामा कंपनीची खासगी बस होती. बस चालकाला थांबलेला ट्रक लक्षात न आल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!