Accident News : सोरतापवाडी येथे भीषण अपघात, टेम्पोची पिकअपला व बसला जोरदार धडक, एक जखमी..


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. दररोज अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो, पिकअप व बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर यांच्या एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आज शनिवारी (ता.१५) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद अभिमन्यु शिरसाठ (रा. भिमनगर धाराशिव) असे अपघातात जखमी झालेल्या प्रवास्याचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक अमोल शिवदास गोरे (वय. ३५, रा. अगळगाव रोड, बार्शी जि. सोलापुर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Accident News

त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गोरे हे एक एस.टी. बसचालक आहेत. ते पुणे सोलापूर राष्टीय महामार्गावरून प्रवाशांनी भरलेली बस घेऊन सोलापूरकडून पुण्याच्या दिशेकडे चालले होते.

त्यांची बस सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर यांच्या एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आली असता, टेम्पो चालकाने पिकअपला पाठीमागून धडक दिली, त्यानंतर टेम्पो चालकाने कोणतेही दिशादर्शक न देता टेम्पो उजव्या बाजूला वळवून बसलाही धडक दिली.

दरम्यान, या अपघातात बसमधील प्रवासी अरविंद शिरसाठ हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात एस.टी.बस, पिकअप व टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टेम्पोचालक शिरसाठ यांच्या दुखापतीस कारणीभुत ठरला आहे. टेम्पोचालक घटनास्थळावरून टेम्पोसह पळुन गेला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!