Accident News : मोठी बातमी! पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी..


Accident News : गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर बायपासजवळ ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या आपघतात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

पंकज खंडू जगताप (वय. ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय. ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय. ५०) (सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. सातारा) अशी अपघातात झालेल्या मृतांची नावे आहेत. Accident News 

मिळालेल्या माहितीनुसार, मंचर जवळ पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

रस्त्यावर दाट धुके असल्यामुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुणे आणि नाशिक दरम्यान वाहतूक वेगाने व्हावी या साठी पुणे नाशिक दरम्यान, खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यात बायपास मार्ग बांधण्यात आले आहे. या मार्गामुळे नाशिकला जाणारा कालावधी कमी झाला आहे. असे असले तरी या मार्गावर भरधाव वाहने चालवली जात असल्याने अपघात वाढले आहे.

या मार्गावरील वाहनांचा वेग आणि नियमांची पायमल्ली करून वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!