Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर ट्रकला धडकल्याने भीषण अपघात, कुंजीरवाडी येथील अपघातात एकजण गंभीर जखमी..


Accident News  : राज्यात अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर एक अवजड वाहनास पाठीमागून कंटेनर धडकल्याने चालक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

हा अपघात कुंजीरवाडीतील (ता.हवेली) धनश्री मंगल कार्यालयाजवळ आज (ता.३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहिती नुसार, बाबत सविस्तर माहिती अशी की,कुंजीरवाडीतील धनश्री मंगल कार्यालयाजवळ ट्रक क्र.MH12, VT 8099 हा यु टर्न घेण्यासाठी थांबलेला असताना पाठीमागून येणारा कंटेनर. MH 43,BP 4878 याने पाठीमागुन धडक दिल.  अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. Accident News

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंटेनर चालक जखमी झाला असून त्यास लोणी-काळभोर (ता. हवेली) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली.  नेहमीप्रमाणेच शहर वाहतूक शाखेचे उमेश ढाकणे व कांबळे यांनी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे व सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!