Accident News : गणेशोत्सवात भयंकर घटना! मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने ३ चिमुकल्यांना चिरडले, धुळ्यात धक्कादायक घटना…


Accident News : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर दु:खाचे सावट आहे. चित्तोडगावातील विसर्जन मिरवणुकीत दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाच्या चुकीने तिघा मुलांना चाकाखाली चिरडले.

या घटनेत तीन चिमुरड्यांचा जागेवरच करुण अंत झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. धुळ्या जवळच्या चित्तोड गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय. १३), शेरा बापू सोनवणे (वय. ६), लड्डू पावरा (वय. ३), या बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

सविस्तर माहिती अशी की, धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. Accident News

जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, गणपती मिरवणुकी दरम्यान ही घटना घडली आहे. धुळ्या जवळच्या चित्तोड गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!