Accident News : सोरतापवाडीत गाडी पलटी होऊन मोठा अपघात! गाडी थेट नर्सरीत, एमआयटीचा विद्यार्थी जखमी..
Accident News : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या महामार्गावरून जात असताना वेरणा गाडी पलटी होऊन थेट नर्सरीत घुसल्याची घटना समोर आली आहे.
या अपघातात लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील भारत पेट्रोलियम पंपाच्या जवळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सोहम पवार असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचबरोबर अजून एक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक माहिती अशी की, सोहम पवार हा त्याच्या मित्रासोबत वेरणा गाडी घेऊन पुणे सोलापूर महामार्गावरून चालला होता. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना, त्याची गाडी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत आली असता गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी थेट नर्सरीत जाऊन पलटी झाली. Accident News
दरम्यान, या अपघातात सोहम गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तोंडावर गंभीर मार लागल्याची माहिती मिळाली आहे. सोहमला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.