Accident News : बस बोगद्याच्या भिंतीला धडकली, घटनेने उडाली खळबळ, घटनेत १४ ठार, ३७ जखमी


Accident News : अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळली, त्यात १४ जण ठार आणि ३७ जण जखमी झाल्याची माहिती चीनच्या राज्य माध्यमांनी बुधवारी दिली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी २:३७ वाजता हुबेई एक्स्प्रेसवेवर झाला. अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.तसेच चीनच्या पूर्वेकडील झेजियांग प्रांतात असलेल्या ताईझोउ येथील व्यावसायिक शाळेत मंगळवारी एक कार गर्दीत घुसली. Accident News

या अपघातात देखील तिघांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ११:२० वाजता ताईझोउ व्होकेशनल आणि टेक्निकल कॉलेजमध्ये घडली. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!