Accident News : भयानक! स्वातंत्र्य दिनी समृद्धी महामार्गावर अपघात, बाप-लेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू….


Accident News : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. वाशिमच्या मालेगांव ते शेलु बाजार दरम्यान च्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाला आहे.

तर २ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगांव ते शेलु बाजार दरम्यान च्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर हा अपघात झाला आहे. Accident News

 पराग सोनार ( वय. ४४ वर्षे ) आणि अनुष सोनार ( वय.७ र्षे ) असे मृत्यू झालेल्या वडील मुलाचे नाव आहे. दीपाली सोनार ( वय.४० वर्षे ) आणि मुलगी ऋजुल सोनार ( वय. १७ वर्षे ) तसेच आणखी एक मुलगा जखमी आहे.

सविस्तर माहिती अशी की, सोनार कुटुंबीय नवी मुंबई वरून वर्धा इथं जात असतांना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कार पाठीमागून ट्रकवर जोरात आदळली. यामध्ये कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.

कारचालक पराग सोनार आणि त्यांचा मुलगा अनुष सोनार याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला इथं पाठवण्यात आले आहे.

अपघात स्थळी कारंजाच्या श्री गुरूमंदिर रुग्ण वाहिकेचे रमेश देशमुख, हायवे पोलीस पोहोचून त्यांनी कारमध्ये फसलेले मृतदेह पत्रा कापून बाहेर काढलेत. एकाच कुटुंबातील कर्ता पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्यानं सोनार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!