Accident News : गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उलटल्याने भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू..

Accident News : राज्यात भीषण अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक भीषण अपघाताची घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. कोल्हापुरात आज मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
नीलू गौतम (वय. ४३), रिद्धिमा गौतम (वय. १७) आणि सार्थक गौतम (वय.१३) अशी मृतांची नावे आहेत. त्याचबरोबर यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.
या झाललेल्या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी खाजगी बस कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ उलटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. Accident News
मिळालेल्या माहिती नुसार, खाजगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस गोव्याहून मुंबईला चालली होती. दरम्यान आज पहाटे दोनच्या सुमारास हीच बस कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला भरधाव वेगात असताना पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर मनपाचे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बचाव कार्य राबवून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.