Accident News : पुण्यात अंगावर काटा आणणारं हिट अँड रन! फटाके फोडणाऱ्या तरुणाला भरधाव कारने चिरडलं अन्..


Accident News : दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवत असतानाच भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने एका ३८ वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दिवाळीच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत आंनद साजरा करत असताना, फटाके उडवीत असतानाच तरुणावर काळाने घाला घातला. आंनदात असणाऱ्या कुटूंबावर काही क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहिती नुसार, रावेत येथील फेलिसिटी सोसायटी समोर सोहम पटेल हा ३८ वर्षाच्या तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत फटाके उडवीत होता.त्यावेळी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाने त्याला चिरडून पळ काढला आहे. Accident News

या अतिशय दुर्दैवी अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. दिवाळीसारख्या आनंददायी सणाच्या दिवशी पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास ४८ तास झाल्यानंतरही या अपघातातील आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलं नाही.

दरम्यान, रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही तर, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!