Accident News : सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप पलटली, १२ लोक जखमी…


(Accident News) पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून कुठेना कुठे अपघात होतच आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून १० ते १२ पर्यटक जखमी झाल्याची घटना सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वळणावर जीप अचानक उलटली. तेथून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले.

मिळालेल्या माहिती नुसार, काल रविवार असल्याने काही पर्यटक हे सिंहगड किल्ल्यावर पर्यटन करण्यासाठी जात असताना हे सर्व पर्यटक ज्या जीपने जात होते.ती जीप सिंहगड घाट रोडवर अकरा हजार वळणावर जीप चालकाचे जीप वरील नियंत्रण सुटल्याने ही जीप घाटात वळणावर पलटी झाली व यातील १० ते १२ पर्यटक हे जखमी झाले आहेत.

पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!