Accident News : वय वर्ष १४ अन् टँकर चालवत ४ जणांना उडवलं, पुण्यात अल्पवयीन मुलाचा धक्कादायक प्रकार आला समोर…


Accident News : पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे.या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.

हा अपघात पुणे शहरातील वानवडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली.

या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर १४ वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी हा टँकरसह अल्पवयीन मुलाला अडवून ठेवले आहे. Accident News

पुण्यात काही दिवसापूर्वीच कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना उडवले होते, या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता हा दुसरा अपघात घडला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!